प्रसिद्ध  चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे सन्मानार्थ  यांच्या नावाने ‘व्हीनस’ ने काढली नवी ब्रश मालिका

प्रसिद्ध  चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे सन्मानार्थ  यांच्या नावाने ‘व्हीनस’ ने काढली नवी ब्रश मालिका

अहमदनगर (प्रतिनिधी) :  नगरमधील जगप्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेच्या सन्मानार्थ सुप्रसिद्ध व्हीनस कंपनीने त्यांच्या नावाने नवी ब्रश मालिका बाजारात विक्रीसाठी आणली आहे. एखाद्या कलाकाराच्या नावाने ही ब्रश मालिका एका चित्रकलेसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीने काढणे ही खरोखरचे त्या कलाकाराच्या कष्टाचे चीज करणारी घटना आहे.
आर्ट पुणे फाउंडेशन आणि व्हीनस ट्रेडर्स यांच्या तर्फे पुण्यात दरवर्षी व्हीनस कला महोत्सव भरविण्यात येतो. यावर्षी या महोत्सवाचे १० वर्ष होते. पुणे येथील घोले पाटील रोडवरील राजा रविवर्मा कला दालनात पार पडलेल्या महोत्सवात या ब्रश मालिकेचे उदघाटन करण्यात आले . जेष्ठ कलाशिक्षक डॉ.  सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते आणि पुणे येथील झपुर्झा संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ,. व्हीनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी, रावसाहेब गुरव, -सुभाष  पवार,प्रियंवंदा,  यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रमोद कांबळेjज् मास्टरस्ट्रोक, आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहे.
व्हीनस ट्रेडर्स मध्ये कला विद्यालयाचे विद्यार्थी, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलाकार जेव्हा चित्रकलेला लागणारे साहित्य खरेदीसाठी येतात तेव्हा ते आवर्जून प्रमोद कांबळे हे कोणत्या प्रकारचे ब्रश, रंग किंवा साहित्य वापरतात याची आवर्जून चौकशी करतात आणि तेच साहित्य खरेदी करतात.  त्यामुळे आपल्याला त्यांच्याच नावाने ब्रश मालिका विक्रीसाठी आणण्याची कल्पना सुचली. कलाकार या ब्रश चा उपयोग करताना प्रमोद कांबळे यांच्या कलेचे बारकावे, त्यांची शैली, निरीक्षण शक्ती अचूकता, आकर्षक कलात्मकता याचा अभ्यास करतील आणि त्यांच्या कलेपासून कलेसाठी जिवतोडून मेहनत घेण्याची प्रेरणा घेतील असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला.
प्रमोद कांबळे यांनी व्हीनस कंपनीने आपल्या नावाने ब्रश मालिका काढल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो. आपल्या कलेचा हा गौरव आहे. माता पिता, गुरु यांचे आशीर्वाद आणि पुण्याई आहे त्यामुळे हे घडले.  नवोदित कलाकार आणि व्यावसायिक कलाकारांना यातून निश्चित झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles