- Advertisement -
आठरे पाटील पब्लिक स्कूल ने मिळवले मुलांच्या ३ वयोगटांचे विजेतेपद- तर मुलींमध्ये आर्मी पब्लिक स्कूल विजेती.
फिरोदिया -शिवाजिअन्स ५ वि इंटरस्कूल फुटबॉल स्पर्धा नगर कोलेजच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धा फिरोदिया-शिवाजिअन्स स्पोर्ट्स क्लब अ.नगर -पुणे,तसेच शांतिकुमारजी फिरोदिया मेमो.फाऊंडेशन ट्रस्ट व अ.नगर फुटबॉल असो.च्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचा बक्षीस संभारंभ नुकताच संपन्न झाला.
या स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलने वयोगट १२.१४ व १६ चे विजेतेपद पटकावत या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले व उपस्थितांच्या टाळ्य्या मिळवल्या तर मुलींमध्ये आर्मी पब्लिक स्कूलने विजेतेपद मिळवत मानाचा करंडक पटकाविला.त्यांना प्रमुख पाहुणे नगर कोलेज चे व्हॉ.प्रिन्सिपॉल रजाक सय्यद,डॉ.दिलीप भालसिंग,रजिस्टार प्रो.दीपक आल्हाट,डॉ.अनिल आठरे पा.फुटबॉल असो.चे अध्यक्ष व युवा उद्योजक नरेंद्र फिरोदिया.शिवाजीयन्सचे सेक्रे.मनोज वाळवेकर यांच्या हस्ते बक्षीस व मानाचा करंडक देऊन गौरविण्यात आले.
१२ वर्ष वयोगटात उपविजेतेपद औक्झिलीयंम कॉन्व्हेंट स्कूलने तर ब्रॉंझ पदक ओयासिस पब्लिक स्कूलने मिळवले.१४ वर्ष वयोगटाचे उपविजेतेपद आर्मी पब्लिक स्कूलने पटकाविले तर ब्रॉंझ पदक सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलने मिळवले.१६वर्ष वयोगटात उपविजेतेपद आर्मी पब्लिक स्कूलने मिळवले तर ब्रॉंझ पदक श्री साई इंग्लिश मेडीयम स्कूलने मिळवले मुलींच्या गटात उपविजेतेपद हे श्री साई इंग्लिश मेडीयम स्कूलने मिळवले .
नरेंद्र फिरोदिया यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व शालेय संघांचे स्वागत केले.ते पुढे म्हणाले फुटबॉल हा खेळ आंतरराट्रीय कीर्तीचा खेळ असून नगरमध्ये या मैदानी व सर्वांग सुंदर अश्या खेळाची चागली पाळे – मूळे रुजावीत, बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी इंटरस्कूल फुटबॉल स्पर्धेचे आम्ही आयोजन करत आहोत वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करत असतो नगरमधील फुटबॉल खेळाचे प्रेमी स्व.गॉडवीन डिक यांनी या खेळाच्या प्रसार व प्रचारासाठी मोठी चळवळ राबविली होती.
या शालेय फुटबॉलच्या स्पर्धांचे होत असलेले आयोजन हि त्यांना दिलेली एक आदरांजलीच असल्याचे उदगार फिरोदिया यांनी काढले.ते पुढे म्हणाले या वर्षी १४ विद्यालयातील वयोगटाप्रमाणे ३४ संघाचा यात सहभाग होता.गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत एकूण ७० सामने खेळले गेले.यंदाच्या वर्षी महत्वाचे म्हणजे मुलींच्या देखील संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.अश्या स्पर्धांमधून नगरमधील संघानी खेळाडूंनी राज्य,राष्ट्रीय,तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर चमकावे अश्या या स्पर्धेच्या आयोजना मागील उद्धेश असल्याचे स्पष्ट केले.अहमदनगर कॉलेज या स्पर्धांसाठी कायम मैदान उपलब्ध करून देत असल्याबद्धल आभार व्यक्त करून सर्व संघांचे अभिनंदन केले व यापुढेही जास्तीत जास्त संघानी अश्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
या स्पर्धा यशस्वीपणे आयोजनासाठी योगदान देणाऱ्या कु.पल्लवी सैंदाणे,तसेच व्हिक्टर जोसेफ,झेवियर स्वामी,अनिल शिकलगार,तसेच या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिलेले सर्वश्री अभिषेक सोनवणे,सुयोग महागडे,अभय साळवे,प्रभू सिल्वासकुमार,सुशील लोट,राजेश चव्हाण अरमान फकीर,अन्वर सय्यद ,हिमांशू थोरात व रॉबिन आंग्रे यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.या स्पर्धेतीळ प्रत्येक म्याचमध्ये उत्कृष्ठ खेळी करणाऱ्या खेळाडूला करंडक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.पल्लवी सैदाणे यांनी आभार मानले.
- Advertisement -