बहुजन मुक्ती पार्टीचे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे

0
92

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) खासगीकरण थांबवून राज्य शासनाचा दर्जा देण्याची मागणी

शेतकर्‍यांच्या वाढीव वीज बिलाची होळी

एसटी महामंडळाच्या ३७६ कर्मचारी निलंबनाचा निषेध

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) खासगीकरण थांबवून राज्य शासनाचा दर्जा मिळावा, शेतकर्‍यांचे वाढीव वीज बिल कमी करुन वीज कनेक्शन तोडणी कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तर एसटी महामंडळाच्या ३७६ कर्मचारी निलंबनाचा व त्रिपुरा मध्ये मुस्लिम समाजबांधवांच्या धार्मिक स्थळ व घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.प्रारंभी वीज महावितरणने शेतकर्‍यांना दिलेल्या वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली.

या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओहोळ,युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष संजय सावंत, जिल्हा प्रभारी राजेंद्र करंदीकर,जिल्हाध्यक्ष समीर शिंदे,राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (एसटी महामंडळ) प्रदेशाध्यक्ष अमोल बनसोडे,राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्य सचिव अर्जुन ओहोळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बचाटे, शिवाजी भोसले,सुधीर खरात, बाळासाहेब शिरतार,विलास कांबळे,दादा शिंदे,सुभाष बोराडे,शहाजी शिंदे,लक्ष्मण सावंत,मनोहर वाघ,गणेश चव्हाण,अय्युब शेख,दत्ता पवार,डी.एस.शिंदे,किरण सोनवणे,संपत पवार आदी सहभागी झाले होते.

या आंदोलनाच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यात आला. तर राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळास राज्य शासनाचा दर्जा द्यावा, एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळावे,आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये मदत व कुटुंबाच्या सदस्याला शासकीय नोकरी मिळावी, शेतकर्‍यांना लावलेले वाढीव वीज बिल कमी करावे, बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई त्वरीत थांबवावी,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली.या मागणीचे निवेदन कोतवालीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना देण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,एसटी कर्मचारी संघटना, बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here