बाराबाभळीत बेकायदेशीर मुरूम उत्खनन दाखवूनही कारवाईस महसुल प्रशासनाची टाळाटाळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बाराबाभळीत बेकायदेशीर मुरूम उत्खनन दाखवूनही कारवाईस महसुल प्रशासनाची टाळाटाळ

अधिकारी मुरुम माफियांवर मेहरबान असल्याचा आरोप

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगार जवळील बाराबाभळी परिसरात बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफीयांवर व सदरची माहिती देऊन देखील संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तहसिलदार, तलाठी व सर्कल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा सचिव प्रशांत पाटोळे, जिल्हा उपसचिव संतोष सारसर, सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट, विकास पंडित, दिपक नकवाल, प्रविण घावरी, संजय खरे आदी उपस्थित होते.
भिंगार येथील बाराबाभळी परिसरात बेकायदेशीर मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. भिंगार येथे नगर-पाथर्डी महामार्ग लगत रस्त्याच्या बाजूला शाळा व लोक वस्ती आहे. तर दररोज मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरत असते.

अशा परिस्थितीत या ठिकाणी बेकायदेशीर मुरूम उत्खनन करुन भरधाव वेगाने डंपरची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या  वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर काही नागरिकांचा या अपघातात जीवही गेलेला आहे. दिवसंदिवस मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सोमवारी 24 जून रोजी दुपारी बाराबाभळी येथील मोरे वस्ती परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरु असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष खरारे यांनी तहसीलदार यांना फोनद्वारे कळवली होती. तहसीलदार यांनी सर्कल व तलाठी यांना कारवाई करण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले. कारवाई करण्यास कोणी आले नसल्याने खरारे यांनी तलाठी यांना संपर्क केला असता, त्यांनी तहसीलदार यांचा कारवाईसाठी फोन आल्याचे सांगितले व कामात असल्याने कारवाईला उशीर होणार असल्याचे स्पष्ट केले. चार ते पाच वेळा फोन केल्यानंतर तलाठी घटनास्थळी आले व कोणत्याही प्रकारची कारवाई न करता निघून गेले.

याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यांनी सैन्य दलाच्या परिसरातील कामासाठी मुरूम उत्खनन करण्यात आल्याचे त्यांनी उत्तर दिले. मात्र सैन्य दलाची परवानगी असलेले पत्र त्यांनी अद्यापि दाखवलेले नाही. सदर उत्खनानाच्या मुरुमाच्या डंपरचा पाठलाग केल्यास तो मुरुम खासगी कन्स्ट्रक्शन लाईनसाठी टाकला जात असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

महसुल यंत्रणेतील हे कृत्य संशयास्पद व बेकायदेशीर मुरूम उत्खनन करणाऱ्यांना पाठिशी घातले जाण्यासारखे आहे. सर्व पुरावे देऊन देखील कारवाई न करता दिवसाढवळ्या मुरुम माफियांवर मेहरबानी सुरु असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!