बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते जोमाने काम करणार; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक..

बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते जोमाने काम करणार; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक..

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सुचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामतीत पार पडली.. या बैठकीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी, संतोष दासवडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करुन सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटेकरी ठरतील अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.. मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह राहिला आहे.. त्यातही शर्मिला ठाकरे या माझ्या खास मैत्रिण आहेत असं सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितलं.. माझ्या या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या मनसैनिकांची जाणीव ठेवून त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद असेल असंही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं..
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

Click to scroll the page