महामार्गावर एकेरी रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी दिला आहे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे
अहमदनगर प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी शेवगाव – गेवराई महामार्गावर बालमटाकळी ता . शेवगाव येथे “ महामार्गावर शाळा भरो आंदोलन ”
“ महामार्गावर एकेरी रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मौजे बालमटाकळी हे प्रमुख मोठे गाव आहे. बालमटाकळी गावाच्या उत्तर बाजूला बालमटाकळी ते कांबी हा रस्ता आहे .

या रस्त्यालगत गावतील बहुसंख्य लोकांच्या शेतजमिनी तसेच वस्त्या आहेत . हा रस्ता या गावातील प्रमुख व दळणवळणाचा रस्ता आहे . बालमटाकळी पासून सुमारे ३ कि.मी. पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे . परंतु त्यानंतर पुढील ६ कि.मी. चा रस्ता अस्तित्वात राहिलेला नाही . या रस्त्यावर गुडघाभर खोलीचे तर काही ठिकाणी कमरे एवढ्या खोलीचे खड्डे तयार झालेले आहेत .
गेल्या दोन वर्षापासून या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कमरेएवढा गाळ असलेल्या रस्त्यावरून शाळकरी मुलांचे येणे – जाणे शक्य होत नाही.परिणामी त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. तसेच इतरांनाही जाणे – येणे शक्य होत नाही . त्यामुळे काही लोकांच्या शेतातून (श्री.चंद्रकांत मोहनराव गरड) शेतातून जातात. तथापी या रस्त्याबाबत शासनाचे व राज्यकर्त्याचे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. सदरच्या गाळाच्या रस्त्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतर अक्षरशः पाच सहा दिवस शाळकरी मुलांना रस्त्याअभावी शाळेत जाता येत नाही.
एखादी व्यक्ती जर आजारी पडली तरी रस्त्याअभावी त्याच्यावर कुठलाही वैद्यकीय उपचार करता येत नाही . या परिसरातील या रस्त्यावर सुमारे १५० घराच्या आसपास लोकवस्ती आहे . परंतु रस्त्याअभावी शेतीची कामे वा शेतात जाणे – येणे दुरापास्त होते . परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी शेतीची अवजारे , खते ने – आण करण्यासाठी कोणत्याही साधनांचा वापर करता येत नाही. विशेष म्हणजे बैलगाडी व ट्रक्टरचा देखील वापर करता येत नाही, अशा दयनीय परिस्थितीत बऱ्याचदा शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष्य वेधून देखील या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .हा ६ कि.मी. अंतराचा रस्ता अत्यंत कच्चा राहिलेला आहे .
याबाबत दि .०१ / ०७ / २०२२ रोजी मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जि . प . अहमदनगर यांना या रस्त्याबाबत माहिती देवून रस्ता करण्याची विनंती केलेली आहे. तरीही अद्यापपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. हा रस्ता होण्यासाठी दि १७/०८/२०२२ रोजी सकाळी ० ९ : ३० वा . शेवगाव – गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे या परिसरातील विद्यार्थ्यांची
१. “ शाळा भरो आंदोलन ”
२. महामार्गावर ” एकेरी रस्ता बंद आंदोलन ” करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.या आंदोलनामध्ये या परिसरातील सर्व महिला, पुरुष,शाळकरी विद्यार्थी सामील होणार आहेत.तरी आपण या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा रस्ता तातडीने करण्याची कार्यवाही करावी.
अन्यथा दि .१७/०८/२०२२ रोजी वरील प्रमाणे दोन्ही आंदोलने या रस्त्यावर होतील असे निवेदन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांना जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी बालमटाकळी येथील ग्रामस्थ राहुल लेंडाळ गणेश गाढे,विक्रम गरड,विश्वास लेडाळ,एकनाथ काळे,विठू बागडे,भास्कर सुपेकर, राजू मामा फलके (श्रीगुरुदेव),संभाजीराजे टाकळकर, बाळासाहेब सौंदर,कैलास लेंडाळ,विलास लेंडाळ,रंगनाथ गोर्डे,शिवाजी शिंदे,जयराम शिंदे, बापू गोर्डे, अमोल खरड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.