बोल्हेगाव येथील महापालिकेच्या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांनी गिरवले योग – प्राणायामाचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव, गांधीनगर येथील महापालिकेच्या कै. बाळासाहेब केशव ठाकरे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र, उमेद सोशल फाऊंडेशन व प्रगती फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
योग शिक्षिका कविता अनारसे यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. तर योगाचे निरोगी आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ म्हणाल्या की, निरोगी जीवनासाठी योग सर्वोत्तम ठरत असून, संपूर्ण जगाने भारताच्या योग-प्राणायामाचा स्विकार केला आहे. योगाने अनेक आजार, विकार बरे होऊन आनंदी जीवनाचा लाभ घेता येतो. अनेक दुर्धर व्याधींवर योग-प्राणायामाद्वारे मात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. राजळे सर यांनी योग विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, सल्लागर ॲड. दीपक धीवर, रवी सुरेकर, विजय लोंढे, शाळेचे मुख्याध्यापक अक्षय सातपुते, योगेश राजळे, सुनील रोटे, सुरेखा घुले, प्रीती जाधव, गयाबाई गिते, वर्षा दिवे आदी उपस्थित होते. या उपक्रमास नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजीराव खरात, जय असोसिएशन ऑफ एनजीओ अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राजळे यांनी केले. आभार अक्षय सातपुते यांनी मानले.