मंदिराजवळ शौचालयामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या चालल्या आहे : युवक अध्यक्ष श्रावण काळे

- Advertisement -

मंदिराजवळ शौचालयामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या चालल्या आहे : युवक अध्यक्ष श्रावण काळे

अहमदनगर प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की विशाखापट्टणम महामार्गावर असलेले खंडोबा मंदिर जवळ सार्वजनिक शौचालय उभारू नये. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी युवक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रावण काळे, ओंकार फिरोदे, निलेश तेंडुलकर, आदित्य काटे, पवन नायकू सोमा हरबा,यश अमिल्वादे, ओमकार हरबा, रोहन नायकू, राजू दहिंहाडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की नगर पाथर्डी रोडवरील असलेल्या खंडोबा मंदिर जवळील सार्वजनिक शौचालय परत त्याच ठिकाणी न बांधता कॅन्टोन्मेंट शाळे जवळील मोकळ्या जागेत बनवावी. मंदिरा जवळ बांधू नये, यामुळे हिंदूंच्या भाविकांची भावना दुखावल्या जात आहेत. आणि ह्या सार्वजनिक शौचालय मुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होते, दुर्गंधी पसरते, या सार्वजनिक शौचालयाचा वापर स्थानिक नागरिक  कोणीच नाही, याबाबत अनेक नागरिकांनी यापूर्वी देखील निवेदनाद्वारे तक्रार केली परंतु कुठलीही कारवाई केली नाही. परंतु यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles