मनपा कामगार युनियनच्या वतीने मतदान जनजागृती

मनपा कामगार युनियनच्या वतीने मतदान जनजागृती

मनपा कामगार करणार 100% मतदान – बाबासाहेब मुदगल 

नगर : लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून अहमदनगर दक्षिण मतदार संघामध्ये जास्तीत जास्त मतदान घडावे यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या सुचनेनुसार अहमदनगर मनपा कामगार युनियन च्या वतीने कामगारांमध्ये जनजागृती करत,आपले कुटुंब व मित्रपरिवार यांनी 100% मतदान करण्याचा संकल्प केला आहे. आपल्याला संविधानाने दिलेला हक्क बजवायचा असून लोकशाही प्रक्रिया निर्भय बनवायची आहे. असे प्रतिपादन मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केले.
केडगाव येथे लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने कामगारांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे. यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अध्यक्ष जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, प्रकाश साठे,विजय कोतकर,महादेव कोतकर आदी उपस्थित होते.
सरचिटणीस आनंद वायकर म्हणाले की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला  दिलेला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. युनियनच्या माध्यमातून कामगारांमध्ये जनजागृती करीत असून आज केडगाव येथे सफाई कामगारांना मतदानाबाबत माहिती दिली आहे. मतदान हे गुप्त करायचे असून ते कोणालाही करा त्या माध्यमातून चांगला लोकप्रतिनिधी निवडून येईल व कामगारांचे प्रश्न मार्गी लागले जातील. यासाठी मनपा कर्मचारी 100% मतदान करणार आहे. आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 75 टक्के मतदान करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले.
चौकट :
लोकसभेचे 13 मे रोजी मतदान होत असून मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवाराला शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान करावे व कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर महापालिकेकडे घोषणापत्र भरून द्यावे असे आव्हान कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी केले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles