मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून “ग्रीन सिटी” संकल्पनेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

स्वप्नातील हरित नगर सत्यात उतरणार – आ. संग्राम जगताप

एमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली १ हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

समाजामध्ये पर्यावरणाचे महत्व पटू लागल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहत आहे.मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये वृक्षारोपण संदर्भात जनजागृती करत आहेत त्यांच्या प्रयत्नास आता यश येऊ लागले आहे.एमआयडीसीतील इटन इंडिया फाउंडेशन व कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षित संस्थेच्या वतीने “ग्रीन सिटी” प्रकल्पाला सुरवात झाली आहे, दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून शहरांमध्ये सुमारे पाच हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.स्वप्नातील ‘हरित नगर’ आता सत्यात उतरणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्तबाग महालाजवळ इटन इंडिया फाऊंडेशन व कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षित संस्थेच्या वतीने १ हजार वृक्ष लावून “ग्रीन सिटी” प्रकल्पाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मा.महापौर बाबासाहेब वाकळे,स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,ईटन कंपनीचे एच.आर हेड राजेश पेवाल, सभागृहनेते रवींद्र बारस्कर,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,नगरसेविका मीनाताई चव्हाण,उद्योजक मोहन मानधना,प्रा. माणिकराव विधाते,बाळासाहेब पवार, उद्यान प्रमुख मेहर लहारे,विजय भोसले,सुनील डोंगरे,सचिन भदरगे,संकेत शिंगटे,पराग कानडे, पराग मानधना,रंजना उकिरडे,हेमलाता कांबळे,किसन कसबे,राहुल कसबे,सतिष ढवण,किशोर सुतार,स्वप्नील ढवण,नम्रता शिंगोटे, स्वामी कालेकर आदी उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की, पूर्वी पावसाळा आला की शासकीय यंत्रणा दरवर्षीप्रमाणे एकाच खड्ड्यात वृक्षारोपण करून फोटो सेशन केले जाते त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे ऋतुमानात बदल होताना दिसत आहे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, कोरोनाच्या महाभयंकर संकट काळामध्ये ऑक्सीजनचे महत्व मानवी जीवनाला पटले आहे यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाकडे नागरिक वळू लागले आहेत असे ते म्हणाले.

मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर म्हणाले की,प्रभागा मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.विकास कामे करीत असताना आपण समाजाचे काहितरी देणे लागतो याभावनेतुन पर्यावरणावर काम करण्याची आवड असल्याने वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी करत आहे.आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून समाजामध्ये काम करीत असताना माझ्यावर ‘मनपा वृक्ष संवर्धन’ समितीची जबाबदारी दिली आहे.इटन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात १ हजार वृक्ष लागवडीचा “ग्रीन सिटी” प्रकल्पाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.यामध्ये १० ते १२ फुटाच्या वृक्षासह ट्रीगार्ड लावण्यात येणार आहे.तसेच एक वर्षाची संगोपनाची जबाबदारी फाउंडेशने घेतली आहे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना इटन कंपनीचे राजेश पेवाल म्हणले की,कंपनीच्या सीएसआर फंडातून शहरांमध्ये १ हजार वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर हे खऱ्या अर्थाने पर्यावरणावर काम करीत असल्याने कंपनीने पुढाकार घेतला आहे.कंपनी आता या झाडांची लागवड करून १ वर्ष या झाडांचे संगोपन करणार आहे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कंपनी नेहमीच अग्रेसर असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!