अहमदनगर प्रतिनिधी – मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मनसे विद्यार्थी सेनेच्या नगर शाखेच्यावतीने कोकणातील आपल्या बांधवांवर आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी आपण त्यांच्या मदतीला धावून गेलेच पाहिजे. या भावनेतून ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून काम केले आहे. या पाठविण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरुपाच्या घरांमुळे पुरग्रस्त लोकांना निवार्याची मोठी सोय होणार आहे. त्याच जीवनावश्यक वस्तू, चादरी, पाणी, औषधे यामुळे त्यांचा काही काळापुरता दिलासाही मिळेल. या उपक्रमासाठी शहरातील दानशूरांसह आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया, आदेश चंगेडिया, गिरिष बाठिया आदिंनी सामाजिकतेचे भान ठेवत सहकार्य केले आहे. कोणत्याही आपत्तीप्रसंगी मनसेचे सैनिक नेहमीच मदतीसाठी धावले आहे. आताही पुरग्रस्तांना मदत करुन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने पुरग्रस्त भागातील महाड येथील तळये या गावात मदत साहित्याचे पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संकेत जरे, प्रमोद जाधव, स्वप्नील वाघ, आदेश गायकवाड, सागर बनसोडे, विजय मोरे, सागर महेसुनी आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना सुमित वर्मा म्हणाले, मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक कार्यातही सहभागी झाले आहे. सध्याच्या कोरोना काळात अनेक संकटांचा सामना करत आहे, त्यात पुर परिस्थितीमुळे त्यात आणखी भर पडली आहे. अशावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकत्यांनी मदत घेऊन तळीये गावात जावून स्थानिक सामाजिक संस्थांच्यावतीने गरजूंना वाटप केली.