खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुस्तकाचे प्रकाशन
अहमदनगर प्रतिनिधी – राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षणामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षकांचे मोठे योगदान आहे पूर्वी संस्थाचालकांनी ग्रामीण भागासह शहरात शिक्षण संस्था उभा केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मराठी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे खाजगी प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न ज्ञात असून लवकरच मुंबई येथे बैठकीचे आयोजन करू टप्प्याटप्प्याने खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षण व शिक्षकेतर महासंघाच्या राज्यव्यापी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड समवेत स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आ.डॉ.सुधीर तांबे,महासंघाचे राज्य अध्यक्ष कां.रं.तुंगार, प्रा.माणिकराव विधाते, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल उरमुडे, जिल्हा सचिव शेखर उंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख, शहराध्यक्ष सुभाष येवले, प्रशांत नन्नवरे व राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, खाजगी शाळेची जबाबदारी शासनाची आहे. उत्तम रित्या मराठी माध्यमाच्या शाळा खाजगी स्तरावर चालवल्या आहेत केंद्र सरकारचे नवीन शिक्षण धोरणामध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या मोफत दर्जेदार व शक्तीचे शिक्षण द्यायचे आहे. खाजगी शाळा म्हणजे सेवाभावी संस्था आहे. शासनाची जबाबदारी मराठी माध्यमाचे शिक्षण देण्याची आहे.
आपण सर्वांनी खासगी शाळांना मदत केली पाहिजे खाजगी संस्थांना मदत करण्याची जबाबदारीही खऱ्या अर्थाने शासनाची आहे. आता विनाअनुदानित शाळा चालवणे शक्य नाही यासाठी शासन स्तरावर खाजगी संस्था व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू.जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बैठक घेतली आहे.त्यांनी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीची स्थापना केली आहे.आदींसह खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करू असे ते म्हणाले.
स्वागत अध्यक्ष आ. संग्राम जगताप यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले व विविध ठराव एक मुखाने मंजूर केले व यावेळी राज्यभरातून खाजगी संस्था चालक व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.