…महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २५ लाख रुपयांच्या मदतीचे पत्र केले सुपूर्त

- Advertisement -

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगिता वर्पे यांच्या कुटूबियांची महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.शासन मदतीचा सुमारे २५ लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्त केले.

मंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करून या परीसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबबात कठोर उपाय योजना करण्याबाबतच्या सूचना मंत्री विखे यांनी दिल्या .या परीसरात मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र आहे.शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रमास्थांनी केल्या.याबाबत गांभीर्यपुर्वक दखल घेवून वन विभागाने द्रोण तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे.शालेय विद्यार्थ्यामध्ये सुध्दा भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून
वनविभागाने जादा यंत्रणेचा वापर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

या भागात रस्तांच्या असलेल्या अडचणीबाबतही ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या याबबात तातडीने प्रस्ताव तयार करा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिली.जिल्ह्याचे वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल उपविभागीय अधिकारी संदीप पाटील तहसिलदार धीरज मांजरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

Click to scroll the page