माझी माती, माझा देश आणि “हर घर तिरंगा” अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात

0
40

अहमदनगर :- केंद्रीय संचार ब्यूरो अहमदनगर यांच्या तर्फे नवनाथ विद्यालय निमगाव वाघा येथे माझी माती, माझा देश आणि “हर घर तिरंगा” अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास अहमदनगर तालुक्याचे वनक्षेत्रपाल हेमेल उबाळे, गावच्या सरपंच सौ. लता अरुण फलके, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, वनरक्षक अफसर पठाण माजी सभापती रामदास भोर, हरीयाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, पै. नाना डोंगरे आदी उपस्थित होते.

यावेळी शाहिद शिवाजी फलके यांच्या पत्नी कांताबाई शिवाजी फलके, शहिद जवान गोरखा नाना जाहाव यांचे बंधू मच्छिंद्र नाना जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत “पंचप्रण शपथ” घेण्यात आली. तसेच नवनाथ विद्यालय येथे चित्रफला स्पर्धा, कृत्य निबंध स्पर्धा व देशभक्ती पर गीत स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत उपस्थीत सर्वांनी हातात माती घेऊन प्रतिज्ञा घेतली. यावेळी भव्यदिव्य अशी तिरंगा फेरीही काढण्यात आली.
******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here