नेवासा प्रतिनिधी – (काकासाहेब नरवणे)
केंद्रीय मंत्री मा.ना. नारायण राणे यांना कायद्याचा दुरूपयोग करून अटक करण्यात आली असून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा येथे निषेध करण्यात आला.यावेळी बोलतांना भाजपा नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी म्हणाले 100 कोटी वसुली प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या नेत्यांना तिघाडी सरकार वाचताना दिसते आहे आणि राष्ट्रवादी चे इंदापूर चे आमदार यांनी केलेल्या वक्तव्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,परंतु केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्यावर लगेचच कार्यवाही केली जाते हे सरकार सूड भावनेने कार्यवाही करत आहे,आम्ही याचा निषेध करतो.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव यांनी निषेध नोंदवला या वेळी किसान मोर्चा जिल्हा पदाधिकारी अशोक कावरे तालुका किसान मोर्चा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे युवा मोर्चा उपाध्यक्ष सूर्यकांत गुंड, महेंद्र कर्डीले , बबन कोलते,आबासाहेब रिंधे, मुबारक शेख,बाबूलाल शेख ,चंद्रकांत कोलते, गणेश पुंड भारतीय जनता पार्टी नेवासा संघटन सरचिटणीस अमोल कोलते , राजेंद्र खाटीक आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.