माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेस शुभारंभ
स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक भावना निर्माण होते – जितेंद्र बिहाणी
नगर – माहेश्वरी युवा संघटनेच्या माध्यमातून समाजाचे संघटक उत्कृष्टपणे सुरु आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी यांच्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचा चांगला फायदा सर्वांना होत आहेत. युवकांच्या नियोजनामुळे समाजही त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देत आहेत. आज क्रिकेटचे वेड सर्वांनाच आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या धर्तीवर शुभारंभ होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमुळे सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. अशा स्पर्धेमुळे समाजात सांघिक भावना निर्माण होत असून, सर्वजण एकत्र येत आनंदीक्षणाचे साक्षीदार होत आहे. युवा संघटना समाजातील सर्व घटकांसाठी करत असलेल्या प्रयत्नामुळे समाजोन्नत्तीचे काम होत आहे. त्यांच्या कार्यास आमच्या सदैव सहकार्य राहील, असे प्रतिपादन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांनी केले.
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष शाम भुताडा, विशाल झंवर, गोविंदा जाखोटिया, अनिकेत बलदवा, गोविंद दरक, प्रतिक सारडा, पवन बंग, सुमित चांडक, पियुष झंवर, पवन बिहाणी, कुणाल लोया, संग्राम सारडा, अभिनंदन कालिया, योगेश सोमाणी, शेखर आसावा, सिद्धार्थ झंवर आदिंसह उद्योजक अशोक खटोड, प्रदीप अट्टल, डॉ.रमेश जाजू, मुकेश पल्लोड, गोवर्धन बिहाणी, सतीश काकाणी, विशाल लाहोटी आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना जितेंद्र बिहाणी म्हणाले, यंदाच्या स्पर्धेनिमित्त वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, प्रत्येक सदस्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचे संवर्धन करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर नगर शहरा जवळील भागात ऑक्सिजन पार्क तयार करण्याचा मानस आहे, यातून वृक्षसंवर्धनाची चळवळ व्यापक होईल, असे सांगितले.
याप्रसंगी अध्यक्ष शाम भुताडा म्हणाले, सदर स्पर्धेत 16 संघ निवडण्यात आले आहेत. याचबरोबर महिलांसाठी वुमेन्स बॉक्स क्रिकट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्य प्रायोजक बांगडीवाला युनिट्री तसेच खडोट ग्रुप, गणेश टेक्सटाईल्स, जाजू डेंटल क्लिनिक, जी.डी.डी. मार्बल, मोना रसायन अमोनिया, अदित्य सोलर, ट्रेक कॅम्प, शशांक बंब आदिंसह सहकार्य लाभत आहे. दरवर्षी होत असलेल्या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असे सांगितले.
प्रकल्पप्रमुख सुमित बिहाणी, अमित खटोड, मुकुंद जाखोटिया, भुषण काबरा, गोविंद काकाणी म्हणून काम पाहत आहेत. सूत्रसंचालन आरजे प्रसन्ना व गोविंदा जाखोटिया यांनी केले तर आभार विशाल झंवर यांनी मानले.