माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा तसेच पौराणिक प्रश्‍न मंजूषा स्पर्धेचे उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा तसेच पौराणिक प्रश्‍न मंजूषा स्पर्धेचे उद्घाटन

पौराणिक ग्रंथ हे आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक – उद्योजक जितेंद्र बिहाणी

नगर – आजची पिढी फास्ट आहे, असे म्हटले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना आपली संस्कृती व संस्कार विसरुन चालणार नाही. आपले पौराणिक ग्रंथ हे आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आहेत. याची जाणिव नव्या पिढीला होण्यासाठी पौराणिक प्रश्‍न मंजुषा हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. तसेच बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. माहेश्‍वरी युवा संघटना समाजोन्नत्तीसाठी राबवित असलेले उपक्रमातून समाजाचे मोठे संघटन निर्माण होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नत्तीसाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांनी केले.

महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवा संघटनेच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा तसेच पौराणिक प्रश्‍न मंजूषा स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीगोपाल धूत, बजरंग दरक, युवा संघटनेचे अध्यक्ष शाम भुतडा, प्रकल्प प्रमुख विशाल झंवर, सुमित चांडक, रविकांत काबरा, सिद्धार्थ झंवर, प्रणव बिहाणी, गोविंद दरक, डॉ.रविंद्र सोमाणी, सौ.सुनंदा सोमाणी, सौ.अलका बलदवा, अतुल डागा, महेश इंदाणी, महेश सोमाणी, डॉ.गणेश सारडा, डॉ.चैत्राली सारडा, सुमित बिहाणी, पवन बिहाणी, पवन बंग, संग्राम सारडा, संकेत मानधने, पियुष झंवर, अनिकेत बलदवा, प्रतिक सारडा, मुकुंद जाखोटिया, गोविंदा जाखोटिया, भुषण काबरा, गोविंद काकाणी आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष शाम भुतडा म्हणाले, माहेश्‍वरी युवा संघटना सर्वांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबवून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधला जात आहे. संघटनेच्यावतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी समाजातील सर्वांचे मोठे सहकार्य मिळत असल्याने आम्हाला नवनवीन उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन मिळत आहे. महेश नवमीनिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमास सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजच्या स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच आपली पौराणिक प्रश्‍नमंजुषाने ज्ञान वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे.

यावेळी  विशाल झंवर म्हणाले, महेश नवमीनिमित्त आयोजित स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येकाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्यातील कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. स्पर्धांना मिळत असलेला प्रतिसाद आमचा हुरुप वाढविणारा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बिहाणी यांनी केले. बॅडमिटन स्पर्धेचे वाडिया पार्क येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे प्रायोजक होते रविकांत काबरा, प्रकल्प प्रमुख म्हणून सिद्धार्थ झंवर, गोविंद दरक, प्रणव बिहाणी यांनी काम पाहिले. तर पौराणिक प्रश्‍न मंजुषा स्पर्धा रामकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे प्रायोजक होते रविंद्र सोमाणी व सौ.सुनंदा सोमाणी होते. प्रकल्प प्रमुख म्हणून विशाल झंवर, समित चांडक यांनी काम पाहिले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!