अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून झालेली दुर्घटना सुन्न करणारी आहे. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.मृत रुग्णांच्या कुटुंबीयांचे दुःख मोठे आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे यावेळी ते म्हणाले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून दोषी असणाऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख व NDRF मधून दोन लाख अशी सात लाख रुपये मदत दिली जाईल असे नामदार थोरात यांनी यावेळी सांगितले.