युवा एक साथ फाउंडेशनने दिली दिव्यांग युवकाला व्हिलचेअरची भेट

- Advertisement -

युवा एक साथ फाउंडेशनने दिली दिव्यांग युवकाला व्हिलचेअरची भेट

महाविद्यालयात जाण्यासाठी मिळाला आधार

युवकांनी समाजातील गरजू घटकांसाठी चालवलेल्या चळवळीतून परिवर्तन घडणार – आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युवा एक साथ फाउंडेशनने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकास व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. या व्हिलचेअरने दिव्यांग विद्यार्थ्यास महाविद्यालय जाण्याची वाट सुखकर होणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील दिव्यांग युवक गणेश मारुती चुकाटे याला व्हिलचेअर देण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, खजिनदार महेश साठे, कार्याध्यक्ष ओंकार पागावाड, मार्गदर्शक योगेश ठुबे, चंद्रकांत काळोखे, नितीन साठे, संतोष ढाकणे, प्रदीप वाघचौरे, राज जाधव, टेरी वाघमारे, प्रिया घायतडक, सुमित भिंगारदिवे, यश शेकटकर, प्रितेश मोहिते, प्रिती क्षेत्रे, हर्षल शिरसाठ, प्रशांत कनगरे, ऐश्‍वर्या चोपडे, गौरव कऱ्हाडे, वैभव पालवे, बंटी तागड, हर्ष तोते, अच्युत गलांडे आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर येथे राहत असलेला युवक गणेश चुकाटे याला चालता येत नाही. मात्र त्याला शिक्षणाची असलेली आवड व जिद्दीने त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाचा कॅम्पस मोठा असल्याने वर्गा पर्यंन्त जाणे व शिक्षणाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविण्यास त्याला अडचणी येत होत्या. या होतकरु युवकाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युवा एक साथ फाउंडेशनने व्हिलचेअरच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी युवा एक साथ फाउंडेशनने सुरु केलेली चळवळ प्रेरणादायी आहे. प्रत्येक महिन्यात सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदत पोहचविण्याचे कार्य फाऊंडेशनच्या युवक-युवती करत आहे. युवकांनी समाजातील गरजू घटकांसाठी चालवलेल्या चळवळीतून परिवर्तन घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे काम सुरु आहे. युवक-युवतींसाठी मार्गदर्शन शिबिर राबवून त्यांना दिशा दिली जात आहे. तर समाजातील प्रत्येक गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासाठी फाऊंडेशन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles