योगदिनानिमित्त १६ जुन ला कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत योगाचे भव्य आयोजन
प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाऊल्स चा परिचय व साऊंड हिलिंग ची अनुभूती अनुभवण्यास मिळणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- योग दिनानिमित्त अहमदनगर मध्ये कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी जॉगिंग ट्रॅक येथे घेण्यात आलेल्या कर्मयोगोत्सव कार्यक्रमाला नगरकरांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे यावर्षी रविवार १६ जून रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने कर्मयोगोत्सव- दोन चे आयोजन तपोवन रोडवरील श्रेयस लॉन्स येथे करण्यात आले असून सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या उत्सवात प्रसिद्ध योगगुरू गायत्री गारडे मार्गदर्शन करणार आहेत.
त्यांनी बेंगलोर मधील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद योग्य विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे नगर मध्ये प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाऊल्स चा परिचय व साऊंड हिलिंग ची अनुभूती अनुभवण्यास मिळणार आहे, त्यासाठी पुणे येथील सायली राऊत ग्लोबल मेडिकल योगा थेरपीस्ट हे उपस्थित राहणार आहेत.
नगरकरांसाठी हि एक मेजवाणी असून प्रवेशिका मोफत असल्या तरी जागेअभावी मर्यादित प्रवेश उपलब्ध आहेत. तसेच सुप्रसिद्ध डाएटिशियन नुट्रिशनीस सौ. ज्योती येणारे हे आहारविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमात योगिक गेम्स चा समावेश असून विजेत्यांना हेल्थ केअर हॅम्पर जिंकण्याची सुवर्ण संधी. डॉ. नेहा शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी ७५८८०२९७१४ /८२०८७०४४११ या क्रमांकाशी संपर्क साधावा. नगरकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मयोगी योग स्टुडिओच्या आयोजकांनी केले आहे.