रस्ते विस्तारीकरणाच्या कामासाठी हटविण्यात येत असलेल्या शहरातील गटई कामगारांचे पिच परवाने व स्टॉल त्याच ठिकाणी कायम ठेवावे

0
88
चर्मकार विकास संघाचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
गटई कामगारांना विस्थापित होण्याची वेळ येणार नसल्याचे आमदार जगताप यांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रस्ते विस्तारीकरणाच्या कामासाठी हटविण्यात येत असलेल्या गटई कामगारांचे पिच परवाने त्याच ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यावर कायम ठेवण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले.

यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर,गटई आघाडीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे, सचिव संतोष कदम, युवक शहराध्यक्ष संतोष कांबळे, माणिक लव्हाळे, ज्ञानेश्‍वर वाघमारे, ज्ञानदेव पाखरे, अशोक नन्नवरे, भिकाजी वाघ, ज्ञानेश्‍वर वाघमारे, एकनाथ नन्नवरे, एकनाथ दुसुंगे आदी गटई कामगार उपस्थित होते.

शहरात सामाजिक न्याय विभाग व महानगरपालिका यांच्या माध्यमातून कष्टकरी गटई कामगारांच्या रोजगारासाठी अधिकृत पिच परवाना व गटई स्टॉल देण्यात आले आहे.मात्र शहरातील काही रस्त्यांबरोबर गुलमोहर रोडचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे.रस्त्याच्या कामासाठी अधिकृत पिच परवानाधारक गटई कामगारांना हटविण्यात येणार आहे.तरी रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर गटई कामगारांचा पिच परवाने व स्टॉल त्याच ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी गटई कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला आहे.गटई कामगारांना दिलेले पिच परवाने व स्टॉल अधिकृत असून,रस्त्याचे काम झाल्यावर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा स्टॉल लावता येणार आहे.रस्त्याच्या कामामुळे कोणत्याही गटई कामगारावर विस्थापित होण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी शिष्टमंडळास आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here