राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
पाथर्डी
आज शासनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत नोकऱ्या मध्ये जे गोर गरीब जनतेची मुले आहेत त्यात महत्वाचा वाटा कृषी विद्यापीठाचा असून ही चार ही विदयापीठे वसंतराव नाईक यांची देन असल्याचे प्रतिपादन तहसीलदार उद्धव नाईक यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती निमित्त पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तहसीलदार नाईक बोलत होते यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे वसंतराव नाईक वाचन मंदिराचे अध्यक्ष विष्णुपंत पवार पंचायत समितीचे कृषी अधिकारी विष्णू पालवे शिवसेनेचे नेते नवनाथ चव्हाण गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव तालुकाध्यक्ष किशोर राठोड शिवसंग्राम चे परमेश्वर टकले कृषी विस्तार अधिकारी एस बी कराळे वरिष्ठ सहाय्यक ओमप्रकाश दहिफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देताना श्री नाईक म्हणाले की अन्नधान्यात स्वयंपूर्णता करण्यासाठी शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने स्थापन केलेल्या राज्यातील चारही विद्यापीठामुळे शासनाच्या विविध क्षेत्रात नोकरीसाठी संधी मिळाली.
सूत्रसंचालन व प्रस्ताविक मंडळ कृषी अधिकारी वैभव थोरे यांनी तर आभार कृषी विस्तारा अधिकारी पी बी कांडेकर यांनी मानले.