राज्यात सुरु असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूण-तरूणी यांना सुविधा उपलब्ध करून द्या – आ. संग्राम जगताप
आ. संग्राम जगताप यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून मागणी
नगर : महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभरात १७ हजार ४७१ पदांसाठी मेगा पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी सतत पाऊस होत आहे.
या पार्श्वभूमीवर इतर भागातील तरुण तरुणी यांच्या मैदानी चाचणीसाठी सदर ठिकाणी आल्यावर त्यांची निवाऱ्याची व आहाराची गैरसोय होत आहे. त्यामुळे मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा, अल्पोपहार व उमेदवारांना चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय सेवा इत्यादी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
तरी वरील बाबींचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेल्या तरूण-तरूणी यांच्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा, अल्पोपहार व उमेदवारास चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय सेवा आदींसह व्यवस्था अशी मागणी आ. संग्राम जगताप यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून मागणी.