- Advertisement -
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह.भ.प. अंकिता ताई घुले यांचे कीर्तन संपन्न.
रामराज्याच्या संकल्पनेतून माणुसकी निर्माण होत असते – ह.भ.प. अंकिता ताई घुले
नगर : रामराज्याच्या संकल्पनेतून माणुसकी निर्माण होत असते. धार्मिकतेची जोड येते तेव्हा रामराज्य निर्माण होत असते. मनुष्याने आपले जीवन जगत असताना भरकटून देऊ नका. प्रभू श्रीरामा च्या विचारातून माणुसकी,संस्कृती जोपासली जात असून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते. समाजामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती दिवसेंदिवस कमी होत चाललीआहे. त्यामुळे चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होत नाही. तरी एकत्रित कुटुंब पद्धती चा वारसा अखंडितपणे सुरू राहवा यासाठी संतांच्या विचाराची खरी गरज आहे. प्रभू श्रीरामाचे चरित्र,आदर्श समाजाला दिशादर्शक आहे. श्रीरामाच्या स्मरणाने अंतकरणात भक्ती,प्रेम, आदर्श असे भाव निर्माण होत असतात. असे प्रतिपादन ह.भ.प.अंकिता ताई घुले यांनी केले.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह.भ.प. अंकिता ताई घुले यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
- Advertisement -