- Advertisement -
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प श्रीराम महाराज मचे यांचे कीर्तन संपन्न.
रामायणातून प्रेमाचे नाते निर्माण होते : ह.भ.प श्रीराम महाराज मचे
नगर : हनुमानाने प्रभू श्रीरामाची भक्ती एवढी मोठी केली होती की, त्यांचे मंदिरे प्रत्येक गावात उभी आहेत. मनुष्याने जीवनामध्ये रामनामाचे “जप करत जा” त्यामुळे आपले जीवन समृद्ध होत असते. पांडुरंगाच्या दरबारात सर्व भक्तांना समतेचा न्याय आहे. आपली वृत्ती चांगली ठेवत संतांचे विचार अंगी करावे परमात्म्याच्या भक्तीमध्ये शक्ती आहे. रावणाने देखील सांगितले होते की, प्रभू श्री रामाबरोबर विरोधात युद्ध करीत असताना रावणाची वृत्ती देखील राममय झाली होती.
शेवटच्या क्षणी शत्रू रूपात रामाचे चिंतन करणाऱ्या रावणाला राममय झाल्याची अनुभूती आली होती. कुठलेही काम करीत असताना श्रद्धा ठेवून करावे त्या माध्यमातून आपण समाजाचा विश्वास संपादन करीत असतो, भगवंताच्या जयघोषाने मनुष्य आनंदीमय जीवन जगत असतो रामायणातून प्रेमाचे नाते निर्माण होत असते, असे प्रतिपादन ह.भ.प श्रीराम महाराज मचे यांनी केले.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह भ प श्रीराम महाराज मचे यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -