राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांना प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शाळेत अभिवादन

0
90

अमरापूर प्रतिनिधी – भारताला स्वातंत्र मिळवून देऊन आकार देणाऱ्या महान विभूती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. परवीन पटेल मॅडम यांनी आपल्या मनोगतात गांधींनी सत्य,अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपल्याला दिलेलं हे स्वतंत्र आणि त्याला आकार देण्यास नेहमी प्रयत्नशील असणारे साधी रहाणीमानाचे शास्त्री यांनी दिलेलं हे स्वातंत्र टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .

गांधीजींनी स्वतंत्र मिळवण्यासाठी सत्याग्रहाचा निवडलेला मार्ग आणि स्वतंत्र लढयासाठी केलेले वेगवेगळे लढे आणि यातून जगावर झालेला त्यांचा विचारांचा प्रभाव आणि याच विचारांचा प्रभाव झालेले आणि आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे लालबहाद्दूर शास्त्री याच्या जीवन आणि कार्य याविषयी मार्गदर्शन आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन पटेल यांचेसह श्री कैलास धनवडे सर,श्री मंगेश वसावे सर,यांच्यासह कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक नियमाचे पालन करून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे श्री मंगेश वसावे सर यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here