राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला स्वयंरोजगार मेळावा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला स्वयंरोजगार मेळावा संपन्न

महिलांनी हाती घेतलेले काम यशस्वीपणे करून दाखवतात –  किरणताई बारस्कर

 नगर : महिलांना संघटित करून त्यांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सबलीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करीत आहे. महिलांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी घरबसल्या गृहउद्योग निर्माण व्हावे यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वयंरोजगार योजना कार्यान्वित केले आहे. तसेच शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. महिलांनी हाती घेतलेले काम यशस्वीपणे करून दाखवत असतात. त्यांच्यामध्ये जिद्द,चिकाटी व मेहनत करण्याची क्षमता असते. महिला या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये कामाच्या माध्यमातून ठसा निर्माण करत यशाचे शिखर गाठले आहे. असे प्रतिपादन किरणताई संपत बारस्कर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महिला स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी किरणताई संपत बारस्कर,डॉ.सागर बोरुडे,अंजली आव्हाड, रंजना उकिर्डे,कविता अभंग,अश्विनी दरेकर,रूपाली कवडे अपर्णा पालवे,सुरेखा फुलपगारे,राणी भाकरे,रेणुका पुंड,रोहिणी अंकुश,सुनंदा शिरवाळे,संगीता भंडारे,दिपाली आढाव,साधना बोरुडे,पुष्पा दौंड,आदी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कविता अभंग म्हणाल्या की, महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन मिळत असते. गृहणींना घरबसल्या स्वयंरोजगार निर्माण करून दिल्यास त्या चांगले काम उभे करू शकतील. यासाठी संपत बारस्कर यांनी आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महिला स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करून हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून छोटे छोटे व्यवसाय निर्माण होतील. असे त्या म्हणाल्या. यावेळी अश्विनी झरेकर व रूपाली कवडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!