अहमदनगर (प्रतिनिधी)- जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व कार्याध्यक्ष खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, किसनराव लोटके सर, आरिफ पटेल, प्रवीण वारुळे, गणेश तोडमल, गणपत शिंदे, गणेश रोडे, अमोल कांबळे, भैया परदेशी, किसन बेदमुथा, बंटी लाहुडे, अमित गांधी, शिवाजी बेरड, दीपक गुगळे, निलेश सातपुते, सचिन हलगे, शहबाज शेख, शहानवाज शेख, अक्षय गर्जे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे हे अपघातानेच सामाजिक तसेच राजकीय कार्यात आलेले आहेत. 28 ऑगस्ट 2017 रोजी निंबोडी शाळा दुर्घटना होऊन त्या शाळा दुर्घटनेमध्ये त्यांची कन्या कु.वैष्णवी प्रकाश पोटे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच त्यांनी जनआधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडलेले आहे व त्यांचा नागरिकांमधला जनसंपर्क दांडगा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य होणार आहे व राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रकाश पोटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चित मदत होणार असल्याचे सांगितले व या निवडीबद्दल प्रकाश पोटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.