अहमदनगर प्रतिनिधी – राष्ट्रीय समाज पक्ष तसेच वंजारी सेवा संघ या दोन्ही ठिकाणी युवक जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री.ज्ञानेश्वर माऊली जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधरजी कोळेकर तसेच वंजारी सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री देवेंद्रजी बारगजे यांनी श्री ज्ञानेश्वर माऊली जायभाये यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
ज्ञानेश्वर माऊली जायभाये हे सामाजिक कार्यात सक्रीय असून, शहरासह त्यांचा जिल्हा व महाराष्ट्रामध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी युवकांचे उत्तमप्रकारे संगठन केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची दोन्ही ठिकाणी युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.श्री ज्ञानेश्वर माऊली जायभाये यांनी समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून कार्य करणार आहेत असे जाहीर केले.
वंजारी सेवा संघाचे संस्थापक श्री राहुल जाधवर व राष्ट्रीय समाज पक्षाचे श्री महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात युवकांची एक मोठी फळी उभारण्याचा संकल्प त्यांनी केला.या निवडीबद्दल वंजारी सेवा संघ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी, विभागीय तसेच जिल्हा कार्यकारणीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.