लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या रायगड निवासस्थानी घेतला पाहुणचार
एकाच कुटुंबात वीस डॉक्टर घडवणाऱ्या स्वर्गीय रामनाथ वाघ यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
अहमदनगर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रामनाथ वाघ यांचे सुपुत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांच्या रायगड निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुटुंबाच्या उच्चशिक्षणाबद्दल सदैव जागरूक असलेल्या आण्णांच्या स्वभावामुळे व उच्च विचारांमुळे आपल्या नव्या पिढीला दिशा देत घरातल्या प्रत्येकाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न ज्या रामनाथ वाघ यांनी साकार केले त्यांच्या या प्रेरणादायी वृत्तीचे कौतुक पवार यांनी यावेळी केले.
सध्या वाघ यांच्या कुटुंबात वीस डॉक्टर आहेत.याप्रकारे शरद पवार आणि रामनाथ वाघ यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.मान.शरद पवारसाहेब जेव्हा नगर दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांनी आवर्जुन रामनाथ वाघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतला. यादरम्यान अण्णा अर्थात जयंत वाघ यांचे वडील रामनाथ वाघ आणि शरद पवार यांच्या जवळपास १९६४ पासूनच्या आठवणींना उजाळा दिला. श्री शरद पवारसाहेब१९६४ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळी पवारसाहेबांनी अण्णांना जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष केले होते तेव्हापासून या दोघांमध्ये दृढ झालेल्या मैत्रीचे आणि एकमेकांच्या राजकीय कारकिर्दीचे साक्षीदार होण्यापर्यंतचा अनेक घटना व प्रसंगाचा उल्लेख या भेटीदरम्यान झाला.
स्वर्गिय अण्णांनी तयार केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारीत “युगप्रवर्तक यशवंतराव ” ह्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सहकार सभागृह येथे १ जानेवारी २००८ रोजी मा शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत झाला. या तब्बल ८०० पानांच्या ग्रंथामधे यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या अनेक खात्यामधे केंद्रीय मंत्री म्हणुन भुषविलेल्या कारकिर्दीमधील ४५०पेक्षा जास्त दुर्मिळ फोटोचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच १ ऑक्टोबर २०१८ रोजी रामनाथ वाघ यांच्या “वळून पाहताना”या आत्मचरित्राचा आणि “कृतार्थ जीवनप्रवास” ह्या अण्णांच्या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा ही मान. पवारसाहेबाच्या हस्तेच यशवंतराव चव्हाण सभागृहामधेच करण्यात आला. कोपरगाव येथे दूध उत्पादकांच्या मेळाव्याला जाताना रायगड निवासस्थानी नगर शहरातील प्रमुख कार्यकत्यांची बैठक पवारसाहेबांनी घेतली होती. याशिवाय अण्णांचे निधन झाल्यांनतर महाविकास आघाडीच्या खातेवाटपाच्या दिवशीही मान.शरद पवारसाहेब अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित होते अशा अनेक घटनांचा उजाळा पवारसाहेबांनी ह्यावेळी केला. यातून एका राजकीय नेत्याच्या मनात आपल्या कार्यकर्ता मित्राप्रती असलेला आदर आणि आपुलकी दिसून येते.
रायगड बंगल्यावरच्या भेटींदरम्यान जयंत वाघ आणि यांच्या पत्नी सौ. संगीता, याशिवाय लोकसभा नगर दक्षिण मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अशोक बाबर, संपतराव म्हस्के, भगवान फुलसौन्दर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, डॉ.अनिल आठरे, कन्या डॉ कृतिका,डॉ धनंजय, डॉ सुमा, डॉ सागर, डॉ मृणाल, अभिजित,दुर्गा आदी उपस्थित होते. यावेळी जयंत वाघ यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
- Advertisement -