वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्षसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.

- Advertisement -

वरिष्ठ पदाधिकारी अन्याय करत असल्याचा आरोप.

आरपीआय आंबेडकर गटामध्ये प्रवेश.

अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन दीपक भाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत आरपीआय आंबेडकर गट मध्ये प्रवेश करून अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निलेश गायकवाड व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख संतोष गलांडे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी सचिन घोडके, आबासाहेब रामफळे, अशोक मोरे, नाना सांगळे, आरपीआय आंबेडकर गटाचे युवक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे, उत्तर जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे, प्रसाद भिवसने, फरीद इनामदार, नितीन जावळे, भगवान गजरमाळ, युवराज शिंदे, अविनाश चव्हाण, अजित भोसले, अतिक कुरेशी, अमोल भोसले, अक्षय चव्हाण, रघुनाथ चव्हाण, प्रशिल कांबळे, भूषण दिवसने, जीवन कांबळे, विलास कांबळे, शरद काळे, गणेश भोसले, बाळासाहेब नेहुल, अकिल पठाण आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश गायकवाड म्हणाले की, सदर वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये राजीनामा देण्यामागे अनेक कारणे आहेत पण त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण व अरुण जाधव हे दोघे बौद्ध समाजातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे त्यामुळे पक्षाची वाढ होत नाही.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना चुकीची माहिती देऊन कायम गैरसमज निर्माण करीत आहे काही दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आली होती त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी स्टेजवर असताना देखील अरुण जाधव यांनी एकाही पदाधिकाऱ्यांचे नाव घेतले नाही व त्यांनी मुद्दाम नाव टाळले आहे. असे प्रकार अनेकदा झाले आहे.

कायम कार्यकर्त्यांचा होणाऱ्या अपमानाला कंटाळून राजीनामा दिला आहे व झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील किसन चव्हाण व अरुण जाधव यांनी पक्षाची फसवणूक केली या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर होत असताना जिल्हा अध्यक्ष असून काहीच करू शकलो नाही खरंतर त्याच वेळी मी राजीनामा देणार होतो पण लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून यावेळी राजीनामा दिला नाही परंतु आता माझी व माझ्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून १० ऑगस्ट २०२४ रोजी प्रदेश अध्यक्ष निलेश शिवकर्मा यांना पाठवला व जिल्ह्यातील या दोन नेत्यांच्या त्रासाला कंटाळून हा राजीनामा दिला आहे यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व इतर कुठल्याही नेत्याबाबत काही तक्रार नसल्याचे सांगितले.

राजीनामा दिल्यावर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर पुढील राजकीय सामाजिक कार्य हे आंबेडकरी चळवळीतील पक्षातच करण्याचा निर्णय झाला असून त्या अनुषंगाने आरपीआय आंबेडकर पक्षात दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करून प्रवेश करतात अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देखील देण्यात आले असल्याचे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीला राजीनामा देऊन आता आरपीआय आंबेडकरी पक्षांमध्ये सामाजिक कार्य करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची भावना पत्रकार परिषदेमध्ये निलेश गायकवाड यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles