कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढणे युवकांची जबाबदारी – नगरसेवक सुनिल त्र्यंबके
अहमदनगर प्रतिनिधी – रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्तदानामुळे अपघातग्रस्त रुग्णांसह रक्तस्त्राव, प्रसुतीकाळ, शस्त्रक्रिया या अशावेळी रक्ताची गरज भासते आणि अशा रुग्णांना आपण केलेले रक्तदान हे जीवनदान ठरते. तेव्हा कोरोना काळातील तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करा, शिबीराचे आयोजन करा ही युवकांची जबाबदारी आहे, असे आवाहन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
प्रभाग 2 मधील संदेशनगर येथील साई मंदिरात अष्टविनायक ब्लड बँक व साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगादेव यांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटन नगरसेवक त्र्यंबके यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, संध्या पवार, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुभद्र त्र्यंबके, दिपक कुडिया, संतोष टाक, धीरज उर्किडे, उद्योजक बबलू सूर्यवंशी, अक्षय कलंके, पुष्पा राऊत, खोमणे मॅडम, सचिन लोटके, उपस्थित होते.
नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय आणिबाणीमुळे संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासत होती. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व वाढत असतांना इतर रुग्णांना रक्ताचे महत्व वाटत होते. रक्ताचे महत्व लक्षात घेऊन साई मंदिरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. असेच सामाजिक कार्य यापुढेही असे सुरु राहील, असे सांगितले.
प्रतिष्टानच्या माध्यमातून समाजसेवा व सामाजिक कार्याची प्रेरणा घेेवून प्रभागात आणखी ही शिबीरे घेऊन रक्तदान शिबीराचे महत्व सर्वांना पटवून देण्याचे काम करु, असे योगेश पिंपळे यांनी सांगितले.
याप्रसंगी जितेंद्र पलिकुंडवार म्हणाले, तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. सध्याच्या काळात रक्तदानाला खूप महत्व आहे. अष्टविनायक ब्लॅड बँक तुम्हाला सर्वोतोपरि सहकार्य करील, असे सांगितले.
या रक्तदान शिबीरास युवकांनी प्रतिसाद देऊन 27 रक्त पिशव्यांचे संकलन केले. सर्वांचे आभार आकाश त्र्यंबके यांनी मानले.