वीर हनुमान पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी दि ०६  जुले  रोजी नगरहून प्रस्थान होणार 

- Advertisement -

वीर हनुमान पायी दिंडी सोहळ्याचे शनिवारी दि ०६  जुले  रोजी नगरहून प्रस्थान होणार 

नगर- सालाबाद प्रमाणे वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठाण च्या वतीने अहमदनगर ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचं शनिवारी दि ०६ जुले  रोजी दुपारी  ४  वा हनुमान मंदिर ,मार्केट यार्ड ,अहमदनगर येथून प्रस्थान होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष दत्ता जाधव  यांनी दिली .
यावेळी दिंडी सोहळ्याविषयी बोलताना सचिव झुंबर आव्हाड म्हणाले कि मागील २१  वर्षांपासून आम्ही या दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आलो आहोत .आमची दिंडी अतिशय शिस्तबद्ध व वेळेचे पालन करणारी आहे .या दिंडी मध्ये जर भाविकांना सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी या मोबाईल नंबर वर ९४०५००१४७४,९४२१३५५१५१,९५८८२६३१३१,९९२३६८११२२ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
दिंडी यशस्वीते साठी मार्गदर्शक  बाबासाहेब भाऊसाहेब जाधव  यांचे मोठे सहकार्य मिळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली,उपाध्यक्ष राजेंद्र कानडे ,सचिव झुंबर आव्हाड ,विक्रांत राऊत ,संजय महापुरे ,छबुराव गाडळकर ,रामदास कानडे ,गोविंद सांगळे ,भीमराज रासकर ,यशवंत ओटी ,मोहन रासकर ,शंकर रासकर ,नंदू गाडळकर , मनोज आजबे,भूषण कानडे ,राहुल इवळे ,सार्थक सांगळे  आदी प्रयन्तशील आहे .तसेच या दिंडी काळात श्री विशाल गणेश मंदिर चे महंत संगमनाथजी महाराज ,संत चरणरज छगन महाराज मालुसरे, ह.भ .प . डॉ विकासानंद महाराज मिसाळ ,ह. भ.प. संजय महाराज मिसाळ , ह.भ . प . शिवाजी महाराज फुंदे  आदी या दिंडीत सहभागी होणार आहेत.
या दिंडी कालावधीत रोज कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच श्रीराम भक्त सत्संग सेवा मंडळ च्या वतने हनुमान चालीसा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!