शहरात एमबीबीएसचे विद्यार्थी घडविणाऱ्या शाखेचा शुभारंभ
टीएमई एज्युटेक व चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलचा संयुक्त उपक्रम; अल्प दरात जॉर्जिया व रशीयात एमबीबीएस करण्याची संधी
नीटच्या काही गुणांमुळे विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही -ज्ञानेश्वर भस्मे
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या, मात्र नीट परीक्षेत काही गुणांमुळे सरकारी महाविद्यालयात नंबर न लागलेल्या विद्यार्थ्यांना इतर खासगी वैद्यकिय महाविद्यालयापेक्षा अल्प दरात जॉर्जिया व रशीयात एमबीबीएस करण्याची संधी टीएमई एज्युटेकच्या माध्यमातून शहरात उपलब्ध होणार आहे. मागील पंचवीस वर्षापासून देशातील एमबीबीएसचे विद्यार्थी घडविणाऱ्या टीएमई एज्युटेक सावेडी येथील चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलशी संलग्न झाले आहेत.
टीएमई एज्युटेक व चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलने एमबीबीएसचे विद्यार्थी घडविण्यासाठी सुरु केलेल्या शाखेचा शुभारंभ कॅन्सर सर्जन डॉ. सतीश सोनवणे यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीएमई एज्युटेकचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे, संचालक आदित्य खटावकर, रेशु अग्रवाल, प्रियदर्शनी खटावकर, प्रथमेश भस्मे, चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव, प्राचार्या सारिका आनंद, उपप्राचार्या स्टिफन डिसोजा आदी उपस्थित होते.
डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, वैद्यकिय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे भवितव्य उज्वल आहे. परदेशात देखील शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असून, त्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून डॉक्टर होण्याच्या आशेने आलेले अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होतो, मात्र अशा संस्थांमुळे त्यांना दिशा व उभारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर भस्मे म्हणाले की, अनेक पालक मुलांच्या करियरसाठी पैश्याच्या बॅगा भरून तयार आहेत, पण त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. नीट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्रता असताना देखील काही गुणांमुळे त्यांचा वैद्यकिय महाविद्यालयात नंबर लागत नाही. काही गुणांमुळे त्यांना डॉक्टर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. वैद्यकिय शिक्षण क्षेत्रातील ही उणीव भरुन काढण्यासाठी टीएमई एज्युटेकने गुणवत्ता असलेल्या मात्र काही गुणांमुळे नंबर न लागलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण उपलब्ध करण्यासाठी कार्य सुरु केलेले आहे. पुणे येथे मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेचे 25 वर्षापासून डॉक्टर घडविण्याचे कार्य सुरु आहे. संस्थेने मोठी विश्वासाहर्ता निर्माण केली आहे. रशिया, जॉर्जिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, आर्मेनिया या पाच देशात एमबीबीएससाठी विद्यार्थी पाठविण्यात येतात.
रशिया व जॉर्जिया या दोन देशांना प्राधान्य देऊन भारतातील विद्यार्थी पाठविण्यात येत आहे. त्या देशात संस्थेने स्वत:चे हॉस्टेल देखील उपलब्ध केले असून, तेथे भारतीयांप्रमाणे राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सध्या सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी एमबीबीएससाठी रशिया व जॉर्जियात विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले आहेत. तर या 25 वर्षात अनेक डॉक्टर घडविल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक सचदेव म्हणाले की, टीएमई एज्युटेकची संपूर्ण माहिती व त्यांचे कार्य पाहून चित्रकुट इंटरनॅशनल स्कूल मध्ये वैद्यकिय क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शाखा सुरु केली आहे. नीट झालेले अनेक विद्यार्थी काही गुणांमुळे वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले जाते, पर्यायाने त्यांना नर्सिंग कॉलेजमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये खासगी वैद्यकिय महाविद्यालयापेक्षा अत्यंत कमी खर्चात परदेशामध्ये त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण होणार आहे.
तसेच या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी शेती कशी करावी? याचे इंडोनेशिया देशात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागात आधुनिक व चांगल्या पध्दतीने शेती करुन शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहे. पुढील टप्प्यात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या कोर्सचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.