अहमदनगर प्रतिनिधी : – शहीद जवान संतोष तुकाराम वामन यांच्या २० व्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ शहीद जवान वाचनालय, डब्ल्यू डी एफ प्रकल्प, देवगाव नाबार्ड आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच जैन सोशल फेडरेशनचे आनंदऋषीजी हॉस्पिटल मेडिकल अँड रिसर्च सेंटरच्या आनंदऋषीजी नेत्रालयाच्या सहकार्याने नगरच्या देवगावमध्ये आज मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे शिबीर संपन्न झाले.
या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेत्रदान शिबिराबरोबरच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मेजर विष्णुदास यांचा सेवापूर्ती सोहळा,आणि डॉ. कोठुळे यांचा कोव्हीड योद्धा सन्मान ही करण्यात आला. शहीद जवान संतोष तुकाराम वामन यांच्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर ही आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचे शहीद जवान वाचनालयातर्फे देवगाव चे माजी सरपंच आणि पाणलोट विकास समिती चे अध्यक्ष विठ्ठल वामन यांनी आभार मानले.तसेच नेत्र तपासणी शिबिरात तपासणी केलेल्या गरजू रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, शिवसेना युवा प्रमुख राजेंद्र भगत, संजय वामन उपसरपंच हरिदास खळे, संभाजी वामन,खाडके सरपंच पोपट चेमटे, बालेवाडी, सरपंच हरि पालवे , किशोर सिकारे दत्ता तापकिरे,नवजीवन प्रतीस्थान चे अध्यक्ष पवार भाऊसाहेब , प्रशांत वामण,रावसाहेब वामन, रामदास वामन, प्रतिक शिंदे रविंद्र शिंदे ,बलभिम मेजर,प्रदिप वामन,भाऊसाहेब वामन, मानीक वामण,नाना वामण,महेंद्र्र वामण,भाऊसाहेब शिंदे,विजु रसाळ,महादेव जरे आदि उपस्तीत होते