घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे होणार खुली भाविकांसाठी आनंदाची बाब – नगरसेवक मनोज कोतकर
देवस्थान पूर्वतयारीची नगरसेवक कोतकर यांनी केली पाहणी
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती मात्र नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशी सर्व मंदिरे खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
केडगाव रेणुका माता देवी परिसरामध्ये घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा व केडगाव ग्रामस्थांच्यावतीने पूर्वतयारी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन नगरसेवक मनोज कोतकर यांनी व्यक्त केले.
केडगाव देवी मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त पूर्व तयारीची पाहणी करताना नगरसेवक मनोज कोतकर,नवनाथ कोतकर,सुखदेव गुंड,मिनीनाथ कोतकर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.