शिवरंजन संगीतालयाचा विद्यार्थी अद्वैत धनेश्वर तबला प्रारंभिक परीक्षेत केंद्रात प्रथम
अहमदनगर(प्रतिनिधी) : अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या शास्त्रीय तबलावादनाच्या प्रारंभिक परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त करत शिवरंजन संगीतालयाचा अद्वैत गिरीश धनेश्वर केंद्रात प्रथम आला आहे.
शिवरंजन संगीतालयाचे संचालक प्रसिद्ध तबलावादक सुरेंद्र शिंदे यांच्याकडे तो तबल्याचे प्राथमिक धडे गिरवतो आहे.
त्याला प्रकाश शिंदे लक्ष्मण डहाळे यांचे देखील मार्गदर्शन लाभले. अद्वेत हा समर्थ विद्या मंदिर सावेडी येथे इयत्ता तिसरीत शिकत असून त्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक, संगीत शिक्षक, संस्थाचालक यांचे प्रोत्साहन मिळाले. लहानपणापासूनच अद्वैत मध्ये संगीताची आवड रुजली असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Advertisement -