शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने केडगाव येथील ओंकारनगरला वृक्षरोपण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिष्ठान्न भोजनाचे वाटप

माणुसकीच्या भावनेने शिवरत्न प्रतिष्ठानचे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी – नगरसेवक अमोल येवले

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकारनगर परिसरात शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिष्ठान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. बलभीम कर्डिले यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
नगरसेवक अमोल येवले यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन मिष्टान्नभोजनाचे वाटप करण्यात आले. अभय वाघमारे, सोमनाथ गीरे, विष्णू कदम, प्रताप दिघे, अमित जाधव, गणेश गायकवाड, संदेश रासकर, प्रकाश व्यवहारे, नयन शहाणे, महेश कलशेट्टी, शुभम घोरपडे, अमोल वाळके, ओमकार वडे, सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते.

नगरसेवक अमोल येवले म्हणाले की, शिवरत्न प्रतिष्ठानने कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम कर्डिले यांनी गरजू घटकांना विविध स्वरुपात मदत देऊन सहकार्य केले. सामाजिक कार्य करत असताना धार्मिक क्षेत्रात देखील योगदान देऊन त्यांनी जुने असलेले हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.  पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज बनली असल्याचे सांगून, माणुसकीच्या भावनेने शिवरत्न प्रतिष्ठानचे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. बलभीम कर्डिले यांनी कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनची सर्वांना गरज भासली. ऑक्सिजन हे फक्त वृक्षांपासून निर्माण होत असून, मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड होणे आवश्यक आहे. शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!