अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
वैचारिक पातळीवर एकत्रितपणे कार्य केल्यास संघटन मजबूत होते. शिवराष्ट्र सेना आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात उगम झालेला पक्ष आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांना बगल देणार्या यंत्रणेला जाब विचारुन, त्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष आहे. शासनाचा कारभार समाज हिताविरुद्ध चालत असल्यास त्याला प्रखर विरोध शिवराष्ट्र सेना करीत आहे. सामाजिक परिवर्तनाची क्रांती शिवराष्ट्र सेना भविष्यात निश्चित घडविणार असल्याची भावना शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केले.
नालेगाव येथे झालेल्या शिवराष्ट्र सेनेच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात नवसुपे बोलत होते. शिवराष्ट्र सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांची तर जिल्हा सचिवपदी सुभाष आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. अनिता दिघे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कर्पे, भिंगार मंडळ अध्यक्ष राकेश सारवान, नागरदेवळे मंडळ अध्यक्ष कुणाल बैध, तालुका अध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, युवा प्रमुख शंभूराजे नवसुपे, सचिव रजनीकांत आढाव आदी शिवराष्ट्रसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब काळे यांनी या पूर्वी छावा क्रांतिवीरसेनेचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले असून, सध्या ते अखिल भारतीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या संघटनांच्या माध्यमातून काळे यांनी विविध सामाजिक कार्य करुन, कामगार वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली. मागील दहा वर्षापासून वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवराष्ट्रसेनेच्या वतीने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच सुभाष आल्हाट गेल्या पंचवीस वर्षापासून बहुजन चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होऊन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. समाजातील समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे कार्य सुरु असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रावसाहेब काळे यांनी अन्यायाला वाचा फोडू शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सुभाष आल्हाट यांनी जिल्हाभरात संघटना बांधण्याचे कार्य करण्याची ग्वाही दिली. ऍड. अनिता दिघे यांनी काळे व आल्हाट यांच्या माध्यमातून शिवराष्ट्र सेनेला भक्कम आधार लाभला असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव पक्षाला उपयोगी पडणार असल्याचे, त्या म्हणाल्या.
यावेळी महेश काळे, राजेंद्र पाटोळे, महेश गुंजकर, सचिन सदाफुले, अण्णासाहेब अनबोले, संतोष मोटे, दीपक साळवे, दत्ता वामन, राम कराळे, बबन वाघुले, दीपक शिंदे, अनिस सय्यद, विजय वहाडणे, दिनेश रॉय आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.