तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
सकारात्मक विचारातून चांगले काम उभे राहत असते – आमदार संग्राम जगताप
नगर : समाजामध्ये वावरत असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणे गरजेचे आहे गरजूवंतांना मदतीच्या भावनेने आधार देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे म्हणून सकारात्मक विचारातून चांगले काम उभे राहत असते बालघर प्रकल्प येथील गरजूवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून उद्याची युवा पिढी चांगली निर्माण होईल, सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासवी असे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, कामगार कामगार प्रतिनिधी दादासाहेब सुद्रिक, लक्ष्मण तोडमल, अजिनाथ शेवाळे, संतोष भिंगारदिवे, सुरेश साळवे, बाळकृष्ण शिंदे, अरुण घोलप, चंद्रकांत शेटे, अमित मिसाळ, संतोष गिरंगे, बापू गवते, दिनेश मरकड, पांडुरंग कराळे, दर्शन तोडमल, विशाल देवकाते, मेघराज सुद्रिक, योगेश घाडगे, युवराज्य गुंड आदी उपस्थित होते.
कामगार प्रतिनिधी दादासाहेब सुद्रिक म्हणाले की, तपोवन रोड बालघर प्रकल्प येथील विद्यार्थ्यांमध्ये आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी गरजूवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून मिष्ठान्न भोजन देण्यात आले आहे, माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून आता अध्यक्ष संतोष लांडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात असून कामगारांचे प्रश्न मार्गी लावले जात आहे असे ते म्हणाले.