समाजवादी पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

समाजवादी पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

शहरांमध्ये जातीय दंगली पेटवणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी

शहरांमध्ये खुलेआम शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरामध्ये १८ जून रोजी रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले यामध्ये काही जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने हस्तक्षेप करत आहे.

 

प्रथम रामवाडी या परिसरात किरकोळ वादावरून वाद झाले त्याचे पडसाद जातीय दंगलीतून जातीयवादी समाजकंटकांनी मशिदीवर, दर्ग्यावर दगडफेक केली तसेच बेकायदेशीरपणे हातात दांडके व हत्यारे घेऊन दुचाकी वाहनावरून रॅली काढून शहरात जातीय दंगल भडकवणे व दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे.

 

दिल्ली गेट येथील शाही मशीद वर दगडफेक तर त्याचवेळी चितळे रोड येथील दर्ग्यावर दगडफेक करण्यात आली. यानंतर सर्वात मोठी घटना पाईपलाईन रोड येथे बेकरीत काम करणारे मुस्लिम समाजाचे गरीब व कष्टकरी तीन जनावर जीवघेणा हल्ला करण्यात आला यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असून या सर्व घटनेची सखोल पणे चौकशी करून हल्लेखोर व शहरात दंगल पेटवणाऱ्या समाजकंटक यांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे यानी दिले.

 

पुढे निवेदनात म्हटले आहे की, शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून काही समाजकंटक हे शहराचे वातावरण दूषित करण्याचे काम करीत आहे. त्यांच्या विरोधात आपल्याकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आलेले आहे. याच समाजकंटकांना वेळेत आळा घालावा नाहीतर पुढे शहरात मोठी दंगल घडू शकते?

 

सध्या शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून या समाजकंटकांना अटक केल्याने नगर शहरातील शांतता अबाधित राहणार व नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार असून प्रमुख मागण्या शहरातील जातीय दंगली पेटवणाऱ्या समाजकंटक यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी व शहरात दहशत निर्माण करून दोन समाजामध्ये जातीय दंगली पेटवणारे समाजकंटक हे कोणाच्या आदेशानुसार हे करत आहे याची सकोल चौकशी करून शहरात दोन समाजामध्ये जातीय दंगली पेटवण्यासाठी मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करावा.

 

तसेच पाईपलाईन रोड येथील मुस्लिम समाजाचे बेकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला केलेल्या आरोपींचे मागील एक महिन्याचे फोन कॉल तपासण्यात यावे तसेच पाईपलाईन रोड येथील हल्ल्यात जखमींना हॉस्पिटलमध्ये दम देण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची सीसीटीव्ही फुटेज घ्यावी तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!