सरदार बाबासाहेब मिरीकर यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शहराच्या जडणघडणीमध्ये मिरीकर घराण्याचे योगदान अतिशय मोलाचे आहे. सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, बाबावाडी, रिमांडहोम आदी संस्था स्थापन करुन जिल्ह्यातील भावी पिढीसाठी मोलाचे कार्य केले. शहराचा इतिहास लिहायचा असेल तर मिरीकरांच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाणे घ्यावा लागणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सरदार स्व. बाबासाहेब मिरीकर यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील मिरीकर वाडा येथे नगरकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी बाबासाहेब मिरीकर यांच्या प्रतिमेस आमदार जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक संजय चोपडा, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, अ‍ॅड. गोविंदराव मिरीकर, डॉ. शौनक मिरीकर, राजस मिरीकर, सौ. रंजना मिरीकर, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, कवी चंद्रकांत पालवे, साहित्यिक नंदकिशोर आढाव, अ‍ॅड. गौरव मिरीकर आदी उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले की, शहराचा समृध्द ऐतिहासिक वारसा हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सरदार मिरीकर यांनी या शहरावर, इथल्या ऐतिहासिक समृध्दीवर भरभरुन प्रेम केले. हा वारसा सर्वदूर पोहचण्यासाठी व शहराला पर्यटनाचे शहर म्हणून जगात ओळखले जावे यासाठी त्यांनी दिलेले योगदान नगरकर कधी विसरु शकणार नाही. त्यांनी दिलेली प्रेरणा व शहरासाठी पाहिलेले स्वप्न आमदार या नात्याने मी निश्‍चितपणे पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर नगर शहर घराण्यांसाठी समृध्द आहे. यामध्ये मिरीकर घराण्याचे नांव आदराने घेतले जाते. बाबासाहेब मिरीकर यांनी घालून दिलेले संस्कार जपत शहराला भविष्यात विकासाची दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर म्हणाले की, पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराविषयी प्रेम, आस्था, देण्याचा संस्कार मिरीकर घराण्याने नगरकरांना दिला आहे. त्यांनी या शहराला विविध संस्था उभ्या करुन जो ठेवा दिला, त्यांच्या ऋणातून अनेक पिढ्या उतराई होऊ शकणार नाही. मिरीकर नगरचे होते, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. गौरव मिरीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अ‍ॅड. गोविंदराव मिरीकर यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles