सरस्वती प्राथ., माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा रौप्य महोत्सवी वर्ष गुणावत्ता वाढ वर्ष म्हणून होणार साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील सरस्वती प्राथ, माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन मुलांचे स्वागत गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन करण्यत आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयचे प्राचार्य रवींद्र चोभे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मार्गदर्शिका कारले मॅडम, मुख्याध्यापक संदीप भोर, धर्माधिकारी मॅडम आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तक देऊन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेत 93 नवीन विद्यार्थी प्रवेशित झाले. तर अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शाळेचा रौप्य महोत्सवी वर्ष गुणावत्ता वाढ वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे.