सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडीवर – आ. संग्राम जगताप

- Advertisement -

सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडीवर – आ. संग्राम जगताप

वर्चस्व ग्रुपच्या वतीने एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडी घेत आहे. मागील सात ते आठ वर्षापासून वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे दहावी व बारावीनंतर आपले ध्येय स्पष्ट ठेऊन त्या दिशेने विचारपूर्वक वाटचाल करावी. स्वत:चे सामर्थ्य व आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
वर्चस्व ग्रुपच्या वतीने इयत्ता पहिली ते नऊवी मधील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

यावेळी आमदार जगताप बोलत होते. मंगलगेट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर, ज्ञानेश्‍वर ढापसे, ज्ञानदेव पांडुळे, रमेश सानप, कमलेश भंडारी, नंदकुमार ढापसे, पियुष मनोचा, बाळासाहेब पवार, शरद मुर्तुडकर, सुनील क्षेत्रे, धीरज पोखरणा, निलेश खांडरे, प्रशांत मुर्तडकर, उमेश झेंडे, तुषार लड्डा, गणेश कांबळे, सनी जोशी, विठ्ठल उपळकर, प्रमोद भिंगारे, सनी मुर्तडकर, ऋषीकेश खांडरे, बाली जोशी, मयुर राऊत, मयुर बांगरे, संदीप मोकाटे, दिनेश सैंदर, सोनू कोहक, बंटी जाधव, वैभव आव्हाड, भागवत कुरदने, सत्यजीत ढवण, पवन शिंदे, परेश मुनोत आदींसह परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, आजचे लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता घेण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक आहे. सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

सागर मुर्तडकर म्हणाले की, मंगलगेट, कोठला परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार, कष्टकरी वर्गातील मुले शिक्षण घेत आहे. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षी देखील गुणवंतांचा सत्कार करुन गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी ओंकार उर्फ गामा भागानगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. नवीन दप्तर, वह्या व गरजेचे विविध शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी पालकांसह मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles