सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारिता करणार्‍यांचे भवितव्य उज्वल – आ.संग्राम जगताप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मराठी पत्रकार परिषद,शहर पत्रकार समन्वय समिती,केडगाव प्रेस क्लब,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात साजरा
शहरातील पत्रकार व माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनानंतर पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले. टाळेबंदीत वृत्तपत्र बंद असतानाही ऑनलाईन बातम्याच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू होती. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणार्‍या युवकांनी लोकाभिमुख पत्रकारिता सुरु ठेवावी. यासाठी ज्येष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाने बारकावे लक्षात घ्यावे. जमिनीशी मुळे घट्ट ठेवून सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारिता करणार्‍यांचे भवितव्य उज्वल असून, जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त मराठी पत्रकार परिषद, शहर पत्रकार समन्वय समिती, केडगाव प्रेस क्लब, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार, अशोक सोनवणे, विजयसिंह होलम, सुभाष चिंधे, शिरीष कुलकर्णी, बबन मेहेत्रे, बाबा ढाकणे, मिलिंद देखणे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, टिव्हीवर बातम्या पाहिल्यानंतरही सकाळी उठल्यावर सविस्तर बातमी वृत्तपत्रातून कळते. सध्या ऑनलाईन बातम्या वाचण्यात वाढ झाली आहे. पत्रकारितेचे व्याप्ती वाढली असून, पत्रकारांची जबाबदारी देखील वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तसेच नुकतेच निधन झालेल्या समाजसेविका सिंधूताई सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व प्रकाश भंडारे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शहरातील पत्रकार, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमाचे प्रतिनिधी, वृत्तपत्र छायाचित्रकार यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले.

प्रास्ताविकात विजयसिंह होलम म्हणाले की, सर्व पत्रकार एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रमासह चोवीस तास धावपळ करणार्‍या पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवितात.शहराला पत्रकारितेचा मोठा वारसा असून,अनेक दिग्गज पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेतून राज्य गाजवले आहे.

जागृक पत्रकारिता म्हणून जिल्ह्याची ओळख आहे.अनेक महत्वाच्या घोषणा येथे केल्या जातात. हीच परंपरा पुढे सुरु ठेऊन सर्वांगीण विकास व दिशा देण्याचे काम नवीन पिढी पुढे चाल आहे. सध्या पत्रकारिता क्षेत्र विस्तारले असून, डिजिटल मीडियाने क्रांती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सोनवणे यांनी ठराविक वर्गाची मक्तेदारी मोडित काढून बहुजन पत्रकार पुढे आले आहेत. प्रत्येक जाती वर्गाचा व्यक्ती पत्रकार म्हणून एकत्र काम करत आहे. पत्रकारांच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे म्हणाले की, पारतंत्र्यात प्रबोधनाचे कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले.अनेक चळवळी उभ्या राहून क्रांतिकारक निर्माण झाले.आजही पत्रकारितेचे महत्व कमी झाले नसून क्रांती घडविण्याची शक्ती पत्रकारितेत आहे.बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा असा पुढे सुरु राहून समाजाला दिशा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अनिल हिवाळे, प्रफुल्ल मुथा, बंडू पवार, नितीन देशमुख, सुभाष मुदळ, वहाब सय्यद, अन्सार सय्यद, मुरलीधर तांबडे, गोरक्षनाथ बांदल, दत्ता इंगळे, डॉ. अविनाश मोरे, कैलाश नवलानी, प्रकाश साळवे, सुधीर पवार, साजिद शेख, वाजिद शेख, रशिद शेख, सुशील थोरात, आबिद दुल्हेखान, संजयकुमार पाठक, दौलत झावरे, आफताब शेख, विक्रम लोखंडे, दिपक कासवा, अन्वर मन्यार, अमित मन्यार, शब्बीर सय्यद, प्रसाद शिंदे, गोरख शिंदे, राजेंद्र येंडे, मोहसीन कुरेशी, सचिन अग्रवाल, सौरभ गायकवाड, लहू दळवी, निलेश आगरकर, सचिन शिंदे, संदीप दिवटे, विजय मते, सचिन कलमदाने, सचिन मोकळ, रविंद्र व्यवहारे, मंदार साबळे, सागर दुस्सल, विजय मुळे, उदय जोशी, अनिकेत गवळी आदींसह पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी केले. आभार सुभाष चिंधे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!