सर्जेपुरातील वीर गोगादेव मंदिर अतिक्रमण दाखवून पाडण्याची मागणी करून
सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या ताबामारी करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
मंदिर बचाव कृती समिती अध्यक्ष वसंत लोढा यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी) : सर्जेपुरातील वीर गोगादेव मंदिर अतिक्रमण पाडण्याची मागणी केली आहे. हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे . त्यामुळे अशा तांबेमारी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीचे वसंत लोढा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आहे. पोलीस मुख्यालयात ओला यांना ते भेटले. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव दीप चव्हाण, भाजपा ओबीसी सेल चे बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ चिंतामणी, मंदार मुळे, मध्यान त्यांच्यासमवेत होते.
निवेदन देताना लोढा म्हंटले आहे की, नगर मधील सर्जेपुरा भागात मेहतर समाजाचे जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर आहे. नुकताच त्याचा समाजातील भाविक भक्त आणि दानशूर यांच्या योगदानातून मोठा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्याचे सुबक असे सुशोभीकरण झाले आहे. आता काही समाजकंटक ताबामारी करण्यात एक्सपर्ट असलेले गुंड यांनी हे गोगादेव मंदिर म्हणजे अतिक्रमण आहे पालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे असे खोटे निवेदन देऊन मंदिराचे पावित्र्य भंग करीत आहेत.
यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 (अ) (1)(ब),295(अ),120(ब),34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याबाबत अर्ज करणारे व त्यांचा ठेकेदार म्होरक्या यांनी संगनमताने कटकारस्थान रचून समाजातील शांतता भंग होईल आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दुष्ट हेतूने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सौरभ जोशी यांना निवेदन देऊन खोटे तक्रार अर्ज देऊन प्रसिद्धीला दिले आहेत यामुळे शहरात अशांतता पसरवून कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी जागेत समाज निधीतून उभारलेले वीर गोगादेव मंदिर सुबक कलाकुसरीने साकारण्यात आले आहे. नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारे सुंदर देखणे मंदिर तयार झाले आहे.
हे मंदिर पाडण्याची मागणी करणाऱ्या टोळीचे प्रमुख जे आहेत त्यांच्या विरोधात जर कोणी गेले तर त्यांना त्रास देण्याच्या हेतूने असे प्रकार शहरात सुरू आहेत. मागील काही महिन्यापूर्वी नगरमधील प्रसिद्ध व्यावसायिक त्यांच्या विरोधात गेले होते तेव्हा त्यांचे व्यवसाय बंद करून त्यांना त्रास देण्यात आला. त्यावेळी त्यांनी आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यां विरोधात आपला तक्रार अर्ज दिला होता. आठ दिवसांपूर्वी हाजी तकिया ट्रस्टच्या जागेबाबत काही लोकांना उभे करून असेच निवेदन देण्यात आले.
जगताप यांच्या राजकीय विरोधकांना प्रशासनाला हाताशी धरून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे वेगवेगळे भुंगे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून दोन समाजात जाती धर्मात दुहीची बीजे पेरली जात आहेत. हे घातक आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा घेण्यासाठी राजकारण केले जात आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे.
जिल्हाधिकारी साहेब आणि पोलिस अधीक्षक साहेब यांनी या घटनेचा सांगोपांग विचार करून निष्कर्ष काढावा. या कुटील राजकीय वृत्तीचा बंदोबस्त करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. यामुळे शहरात या सर्व गोष्टीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अन्यथा आम्हाला उपोषण आंदोलन अशा सनदशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल. याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर कायदेशीर मार्गाने सर्व पुराव्यानिशी गृह खात्याकडे या ताबामारी गॅंगबाबत दाद मागावी लागेल. असे त्यांनी म्हंटले आहे.
- Advertisement -