सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत मनपाने ठोस  पावले उचलावीत अन्यथा मनसे नागरिकांसह मनपामध्ये मोठे आंदोलन करणार – गजेंद्र राशीनकर 

- Advertisement -

सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत मनपाने ठोस पावले उचलावीत अन्यथा मनसे नागरिकांसह मनपामध्ये मोठे आंदोलन करणार – गजेंद्र राशीनकर 

नगर – सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत मनपाने ठोस  पावले उचलावीत अन्यथा मनसे नागरिकांसह मनपामध्ये मोठे आंदोलन करणार – असा इशारा मनसेचे शहर प्रमुख  गजेंद्र राशीनकर यांनी दिला आहे. मनसेच्या वतीने याबाबत मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ ,शहर सचिव डॉ संतोष साळवे , (शहर उपाध्यक्ष) संकेत व्यवहारे , तुषार हिरवे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना गजेंद्र राशीनकर म्हणाले कि वरील विषयास अनुसरून दि.३१/०१/२०२४. रोजी आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत व संबंधित  ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले होते. तरी आज पर्यंत सदर निवेदनाची कुठल्याही प्रकारची दाखल घेतली नाही.
०७/०२/२०२४ रोजी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख अहमदनगर महानगरपालिका यांनी १० दिवसाची मुदत कारवाई करण्यासाठी मागितली होती, तसेच आमच्या वतीने करण्यात येणारे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती  त्यामुळे कोणतेही प्रकारचे उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले नाही.नागरिकांना स्वच्छतागृहाची गैर सोय होत आहे तरी आपण खालील मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी.
  • सार्वजनिक स्वच्छतागृहे ही २४ तास चालू असावी.
  • संबंधित सर्व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. 
  • महिलांना स्वच्छतागृहाचा वापर हा मोफत असून देखील त्याच्याकडून पैसे घेतले जात आहे ते मोफत करुन द्यावे 
  • स्वच्छतागृहात 24 तास पाणी उपलब्ध करावे.
  • स्वच्छतागृहातील फुटलेले पाण्याचे पाईप व बंद पडलेले बेसिन हे पूर्ववत वापरण्यायोग्य करावे.
  • रात्रीच्या वेळी लाईटचे बल्प चालू करावेत.
वरील मागण्यांवर आपण ०८ दिवसामध्ये कारवाई करावी तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!