सिग्नल सुरु न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल – किरण रोकडे

- Advertisement -

नगर शहरातील बंद सिग्नल चालू करा – मनसे

सिग्नल सुरु न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल – किरण रोकडे

नगर- शहरातील बहुतांश चौकामधील सिग्नल बंद आहे. ते तातडीने सुरु करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी मनपा उपायुक्त श्रीकांत पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी संकेत पाळंदे, नितीन जायभाय, मोहित कुलकर्णी, समर्थ मुर्तडक, ओम जगताप, ऋषी सोनवणे, स्वप्निल वारे, योगेश तांदळे, प्रतीक कदम आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नगर मधील सर्वच महत्त्वाचे रस्ते हे कायमच गर्दीने गजबजलेला असतात.  अनेक चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे छोटे – मोठे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित होत नाही. अनेक अवजड वाहने वेगाने शहरातून जात असतात. भविष्यात महत्त्वाच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात त्यामुळे तेथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी. सध्या शाळा-महाविद्यालय सुरु झाले असल्याने स्कूल बस व विद्यार्थ्यांना अनेक अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तरी सिग्नल यंत्रणा तातडीने सुरु न केल्यास मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे किरण रोकडे यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles