सुमन तिजोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
106

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – वडाळा बहिरोबा येथील प्राथमिक शिक्षिका सुमन तिजोरे यांना बोधी ट्री फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र शासनमान्य संस्था ‘बोधी ट्री फाउंडेशन’ औरंगाबादच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२१- २०२२ या वर्षी महाराष्ट्र राज्यातील ३४ शिक्षकांना जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून सुमन तिजोरे यांचा समावेश आहे.

गेल्या सहा वर्षापासून शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरु माऊलींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.सुमन तिजोरे या वडाळा बहिरोबा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार निवडीचे पत्र ‘बोधी ट्री फाऊंडेशन’चे अध्यक्ष रामदास वाघमारे श्रीमती तिजोरे यांना नुकतेच दिले असून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १६ जानेवारी रोजी संस्थेच्या वर्धापन दिनी संपन्न होणार आहे.

या पुरस्काराबद्दल नेवाशाच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, शालेय पोषण आहार अधिक्षक गलांडे, गट विस्तार अधिकारी शिवाजी कराड, आडाप मॅडम, जीवनगौरव परिवाराचे सोलापूर प्रतिनिधी नागनाथ घोटुळे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ, खरवंडीचे केंद्रप्रमुख श्री कर्जुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॕड. चांगदेव मोटे, वडाळा गावचे सरपंच मीनलताई मोटे, शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव उबाळे, सर्व शिक्षक वृंद तसेच ज्ञानज्योती समूह पं.स.नेवासा आदींनी श्रीमती तिजोरे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here