सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त फुगे सोडून विकास कामांचा शुभारंभ

0
91

लक्ष्मीनगर गृहनिर्माण सोसायटीने पर्यावरणासह परिसराचा विकास केला – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते

नगर शहराचा झपाट्याने विस्तार वाढत आहे, शहरापासून चारही दिशेला ७ ते ८ कि.मी.अंतरावर उपनगरांची संख्या वाढत आहे.नगर-औरंगाबाद रोडवरील सर्वात पहिली व जुनी सोसायटी म्हणून लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्थेची ओळख असून, आज या सोसायटीने वृक्षारोपण करुन संगोपनाची जबाबदारी पार पाडल्याने पर्यावरणासह परिसराचा विकास केला,असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्थेचे सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त मुख्य कमानीच्या नामफलकाचे अनावरण, क्रिकेट अ‍ॅकेडमीचे उद्घाटन,जॉगिंग ट्रॅक वरील ३५० वृक्षांचा तिसरा वाढदिवस, सोसायटीतील गुणवंतांचा विशेष गुणगौरव अशा कार्यक्रमांचा शुभारंभ आकाशात फुगे सोडून करण्यात आला. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी संस्थेच्या कार्याबद्दल आपल्या भाषणातून कौतुक करुन याचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे सांगितले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार नगरसेवक सुनिल त्र्यंबके,विनित पाउलबुधे,सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ खिलारी,उपाध्यक्ष नवनाथ दळवी,संचालक सुर्यकांत झेंडे,संजय कांडेकर, गजानन जाधव,राजेंद्र शेटे, माजी अध्यक्ष गुरुदास भोगे, वसंत सरमाने आदि मान्यवर उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले, संस्थेने ओपन स्पेसमध्ये जॉगिंग ट्रॅक उभा करुन ३५० झाडे येथे लावून ती जगवली, त्यामुळे पर्यावरणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. प्रभागाच्या नगरसेवकांनी येथे ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाईटची कामे केली, त्यामुळे परिसराच्या विकासात भर पडली.

प्रास्तविकात अध्यक्ष एकनाथ खिलारी यांनी सोसायटीने केलेल्या कामांचा अहवाल वाचन केला. आ.संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे आदिंचे बहुमोल सहकार्य मिळाल्याने येथे जॉगिंग ट्रॅक परिसरातील प्रश्न सुटले.नवीन क्रिकेट अ‍ॅकेडमीमुळे येथील विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून येईल.त्यादृष्टीने तिरमल क्रिकेट क्लबने प्रशिक्षण वर्ग सुरु केले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सोसायटीमधील विविध क्षेत्रात यश मिळवून निवड झालेल्यांचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये रौनक सरमाने, पार्थ सरमाने, वकिल संघटनेचे नूतन अध्यक्ष अनिल सरोदे, उच्च न्यायालयातील राजेंद्र खिलारी, सुवर्णा खिलारी, न्युरोलॉजिस्ट डॉ.वैशाली कदम आदिंसह वृक्षसंवर्धनात योगदान देणारे झेंडे मामांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर आभार सुर्यकांत झेंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here